मनोज जरांगे पाटलांनी मागितली शिंदे-फडणवीसांची माफी; केलं ‘हे’ मोठं विधान, काय म्हणाले पाहा….

Manoj Jarange । काही दिवसांपूर्वी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यांच्या याच हिंसक वक्तव्याचे पडसाद आज विधानसभेत उमटले.
त्यानुसार आता त्यांच्या वक्तव्याची SIT मार्फत चौकशी करण्याची घोषणा विधानसभाध्यक्षांनी दिले. त्यानंतर गृहखातं आक्रमक झाल्याचे दिसून आले. आपल्या पोलिसांना मारायचं आणि आपण चूप राहायचं का, यामागील सर्व षडयंत्र बाहेर येईल, असा इशारा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. । Manoj Jarange
दरम्यान, त्यानंतर आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. आई-बहिणीवरून अपशब्द वापरले असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो असे जरांगे पाटील म्हणाले आहेत. । Manoj Jarange
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, त्यावेळी अनावधानाने होतं. ते अमरण उपोषण आहे त्यामध्ये ते झालं. आई-बहिणीवरून शिव्या दिल्या नसतील. दिल्या असतील तर त्यांनी ते विधानसभेत देखील घेतलं असं मला कळलं. ते विधानसभेच्या पटलावर हे बोलले असतील…
मी बाहेरून ऐकलं….. मी आई-बहिणीवरून बोललेलं शिंदे यांना देखील लागलं असेल तर तेवढे शब्द मी मागे घेतो. दिलगिरी व्यक्त करतो. आई-बहिणींपेक्षा मोठं काय आहे आपल्याला? आपण छत्रपतींचे विचार चालवणारे आहोत…. जर असे शब्द निघाले असतील तर… त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो असे मनोज जरांगे पाटील यावेळी म्हणाले.
Manoj Jarange । मनोज जरांगेंच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी होणार –
“जरांगेंच्या विधानांमागे कोण आहे? याची एसआयटी चौकशी करा अशी मागणी विधानसभेत आमदार आशिष शेलार यांनी तर विधानपरिषदेत प्रवीण दरेकर यांनी केली.
तसेच विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील एसआयटी चौकशीची मागणी करण्यात यावी, अशी मागणी शेलार यांनी केली. तसेच जरांगेंच्या भूमिकेमुळे मराठा समाजाची बदनामी होत असल्याचे देखील ते म्हणाले. । Manoj Jarange
दुसरीकडे विधानपरिषदेत प्रवीण दरेकर हे देखील जरांगेंच्या विधानांवरुन आक्रमक झाले. त्यांनी देखील त्यांच्या विधानांमागं कोण आहे? याची एसआयटी चौकशी करावी अशी मागणी केली. तसेच धमक्या देणाऱ्या जरांगेंना अटक करण्याची मागणी केली.





