Vasant More – मनसेचे डॅशिंग नेते वसंत मोरे सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. मराठी माणसाच्या हक्काचा विषय असो वा एखाद्याला मदत करणं असो मोरे आपली प्रत्येक अपडेट सोशल मीडियावरून देत असतात. सोशल मीडियावर देखील त्यांचा मोठा चाहता वर्ग असून, त्यांची प्रत्येक पोस्ट नेहमीच ते चर्चेत असते. मात्र, आता वसंत मोरे हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. आज वसंत मोरे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. कात्रजच्या डेअरी संदर्भातल्या विषयासाठी ही भेट घेतल्याचे वसंत मोरे यांनी सांगितले. परंतु लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर होत असलेल्या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. | Vasant More शरद पवार यांनी विधानसभा मतदारसंघनिहाय पदाधिकाऱ्यांची बैठक त्यांनी बोलावली होती. पुण्यातील निसर्ग कार्यालयात ही बैठक सुरू असताना वसंत मोरे यांची एन्ट्री झाली. मैदान वाचविण्यासाठी त्यांनी पवारांना साकडे घातलेय की बेरजेचे राजकारण? हा प्रश्नही राजकीय वर्तुळात चर्चिला जातोय. मात्र, आपण शरद पवारांची भेट का घेतली? याच उत्तर देखील स्वतः वंसत मोरे यांनी दिलं आहे. यावेळी बोलताना वसंत मोरे म्हणाले की, “मी सुप्रिया सुळे यांना भेटण्यासाठी आलो होतो. माझ्या प्रभागातील मैदानाचा प्रश्न प्रलंबित आहे, जो सुप्रिया सुळे यांच्या बारामती मतदारसंघात येतो. या प्रश्नासाठी मी आयुक्तांना देखील भेटलो आहे. पण प्रत्येक ठिकाणी भेटल्यानंतर या विषयात काहीतरी शिजतेय असे वाटत आहे. अधिकाऱ्यांवरती कुणीतरी मैदानाचे आरक्षण उठवण्यासाठी दबाव टाकत आहे. अजितदादांनी देखील हा विषय टाळला आहे. यासंदर्भात आमच्या खासदारांना (सुप्रिया सुळे) पत्र देण्यासाठी मी आलो होते, जे पत्र मी दोन महिन्यापासून तयार करून ठेवले होते. काल रात्री सुप्रियाताईंचा मला फोन आला. निसर्गला भेटायला या, असे त्यांनी मला सांगितलं. मला माहित नव्हतं या ठिकाणी मोठे साहेब देखील आहेत. त्यांचीही यानिमित्ताने भेट झाली. असं ते म्हणाले. | Vasant More