Maharashtra Budget 2024 : राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज २ वाजता अर्थसंकल्पीय अधिवेशनला सुरुवात झाली आहे. कुसुमाग्रज यांची कविता म्हणत त्यांनी या अर्थसंकल्पाला सुरुवात केली. लोकसभा निवडणूकीच्या दृष्टीने राज्याच्या या अर्थसंकल्पात कोणत्या घटकांना फायदा मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. १ ट्रिलीयन डाॅलर अर्थव्यवस्था करण्यासाठी वाटचाल सुरुवात झाल्याचे यावेळी अजित पवार म्हणाले आहेत. पहिल्या चार महिन्यांसाठी तरतुद करण्यासाठी हा अंतरीम अर्थसंकल्प सादर केला जात आहे.
अर्थसंकल्प सादर करताना अजित पवार यांनी शिवनेरी या ठिकाणी 11 गड किल्ल्यांना जागतीक पातळीवर जाण्यासाठी युनेस्कोला प्रस्ताव पाठवला असल्याचे सांगितले. सोबतच राज्यात सहा वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्यात आल्या आहेत. तसंच केंद्राकडून जीएसटीचे ८६१६ कोटी रुपये मिळाले, असल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी दिली. याशिवाय 7 हजार 500 किमी.ची रस्त्याची कामे हातात घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. याशिवाय भारतातील पहिली मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचे भुसंपदान पूर्ण झाल्याचे देखील त्यांनी सांगितल आहे.
विकास कामांसाठी तरतुद
अजित पवार यांनी 1 ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्था करण्यासाठी वाटचाल सुरु असल्याचे देखील सांगितले. तसेच विकास कामासाठी किती कोटींची तरतुद केली जाणार याची देखील त्यांनी माहिती दिली आहे. त्यानुसार, सात हजार किलोमीटर लांबीचे रस्ते आणखी सुरु करणार आहेत. तसेच रेडीओ क्लब जेटीसाठी २२७ कोटी रुपयांच्या काम सुरु केले जाणार आहे आणि मिहान प्रकल्पासाठी १०० कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली असल्याची माहिती देखील अजित पवार यांनी दिली.
त्याचबरोबर संभाजीनगर विमानतळासाठी ५०० कोटींचा निधी दिला जाणार आहे. तर या अर्थसंकल्पातून वन विभागाला २ हजार ७०० कोटी रुपये दिले जाणार आहेत. तर महामार्गाच्या बाजूला २५ हजार बांबूंच्या झाडांची लागवड केली जाणार आहे. तसेच वीज दर सवलतीत १ वर्षांची मुदतवाढ दिली जाणार आहे. तर जानेवारी २०२४ मध्ये दवोस येथे १९ कंपन्यांसोबत करार झाल्याचे देखील यावेळी अजित पवार यांनी दिली आहे.