लातूर – विधानसभा निवडणुकीचे पडघम आतापासुनच सुरू झाल्याची राज्यात स्थिती आहे. माजी आमदार विनायकराव पाटील (former MLA Vinayakrao Patil) यांनी भाजपाला रामराम केला आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार आहेत. हा निर्णय स्वत: विनायकराव पाटीलांनी जाहीर केला. 29 ऑक्टोबर रोजी ते शदर पवार यांच्या उपस्थितीत यशवंतराव चव्हाण सभागृहात पक्षप्रवेश करतील.
विनायकराव पाटील हे लातूरच्या अहमदपूर विधानसभा मतदारसंघातून दोन वेळेस आमदार म्हणून निवडून आले आहेत. राज्यमंत्री पदी त्यांनी काम देखील केले आहे. गत वेळेस भाजपतील गटबाजीचा फटका त्यांना बसला होता. यात त्यांचा पराभव झाला. भाजपतील अंतर्गत गटबाजीला कंटाळून विनायकराव पाटील यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
पण त्यांचा हा निर्णय अहमदपूरचे राष्ट्रवादीचे आमदार बाबासाहेब पाटील यांच्यासाठी त्रासदायक ठरण्याची चिन्ह सध्या आहेत. गेल्या वेळेस राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आलेले बाबासाहेब पाटील हे अजित पवार गटाचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात.
बाबासाहेब पाटील यांच्या विरोधात आता विनायकराव पाटलांना राष्ट्रवादीत जाऊन दंड थोपटले आहेत. मतदार संघाची रचना विनायकराव पाटलांची कार्यकर्त्याची फळी आणि शरद पवार यांची मदत या त्रिसूत्री संगम करत विनायकराव पाटील यांनी बाबासाहेब पाटील यांना तगडा आव्हान आत्ताच निर्माण केल्याची चिन्ह आहेत.