Virat Kohli Diet Plan : भारताचा माजी कर्णधार आणि महान फलंदाज विराट कोहली हा क्रिकेटमधील सर्वात फिट खेळाडूंपैकी एक आहे. तो त्याच्या फिटनेसबाबत नेहमीच सतर्क असतो. कोहलीच्या फिटनेसची नेहमीच चर्चा होते. तो आपल्या शरीराची एवढी काळजी घेतो की तो संतुलित आहार घेतो. कोहलीने सध्याच्या विश्वचषकात चमकदार कामगिरी केली आहे. त्याने पाच सामन्यात 354 धावा केल्या आहेत. विश्वचषकादरम्यानही कोहली आपल्या खाण्याबाबत खूप काळजी घेत आहे. दरम्यान, त्यांचा फूड मेन्यू समोर आला आहे.
प्रतिष्ठित हॉटेल्समधील शेफनी विश्वचषकादरम्यान भारतीय संघाच्या पौष्टिक गरजा पूर्ण करण्यासाठी एकत्रित प्रयत्न केले आहेत. टीम इंडियाला चविष्ट पण हेल्दी जेवण दिले जात आहे. प्रत्येक खेळाडूच्या आहाराच्या गरजा आणि नियम वेगवेगळे असतात. विश्वचषकादरम्यान टीम इंडिया ज्या हॉटेलमध्ये थांबली आहे, त्या हॉटेलच्या शेफने विराट कोहलीच्या आहाराबदल खुलासा केला आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, बहुतेक भारतीय खेळाडू विश्वचषकादरम्यान उच्च प्रथिने आणि कमी कार्बोहायड्रेट आहाराची निवड करत आहेत. काही खेळाडूंना ग्रील्ड फिश आणि चिकन आवडतात. नाचणी डोसा हा भारतीय संघातील आवडता पदार्थ आहे. टीम इंडियाला नाश्त्यात रागी डोसा आवडतो. दुसरीकडे, शाकाहारी असल्याने विराट त्याच्या प्रथिनांच्या गरजांसाठी टोफू आणि सोयावर आधारित अन्नावर अवलंबून आहे.
विराट मांस खात नाही
रिपोर्ट्सनुसार, हॉटेलच्या बुफेमध्ये विविध प्रकारचे मांस असते परंतु खेळाडू उकडलेले किंवा ग्रील्ड चिकन किंवा मासे निवडू शकतात. विराटसाठी उकडलेले अन्न (उकडलेल्या हिरव्या भाज्या) तयार केले जाते. यामध्ये शाकाहारी डिम सम्स आणि इतर भाज्या-आधारित प्रथिने जसे की सोया आणि मॉक मीट यांचा समावेश आहे. याशिवाय तो टोफू सारख्या दुबळ्या प्रोटीनचे सेवन करतो. त्यांच्या आहारात शक्य तितक्या कमी दुग्धजन्य पदार्थांचा समावेश असतो.
1. विराट फिल्डवर कोणताही वाईट परिणाम होईल असा कोणताही पदार्थ तो खाणे टाळतो आणि जास्तीत जास्त हेल्दी खाण्यावर लक्ष केंद्रीत करतो.
2. विराट आपल्या आहारात जास्तीत जास्त उकडलेल्या गोष्टींवर भर देतो. उकडलेले पालक, काळी मिरी आणि पनीर सलाड एकत्र नाश्त्यासाठी खातो. तसेच 2 कप कॉफी, डाळ, क्विनोवा, भरपूर उकडलेल्या भाजी, डोसा याचा समावेश असून कधीतरी बदाम, प्रोटीन बार याचाही समावेश असतो.
3. व्यायाम केल्यानंतर विराट प्रोटीन शेक, सोया मिल्क अथवा बटर पनीर खाण्याला प्राधान्य देतो. ज्यामुळे त्याच्या शरीराला आवश्यक असणारे सर्व प्रोटीन शरीरात जातात आणि शरीर फिट राहण्यास मदत मिळते.
4. दुपारच्या जेवणामध्ये उकडलेल्या भाजी आणि ब्राऊन ब्रेड अथवा एखादा गोड पदार्थ विराट खातो.
भूकेपेक्षा अतिरिक्त खाण्यानं वजन वाढते त्यामुळे तो भूकेपेक्षा (९० टक्के पोट भरेपर्यंत) कमी खातो .
5. रात्रीचे जेवण नेहमी हलके खातो. यामध्ये अत्यंत साधे जेवण असून यामध्ये पोळी, आमटी आणि उकडलेल्या हिरव्या भाज्यांचा समावेश आहे.
हायड्रेशनसाठी ब्लॅक वॉटर
कोहली हायड्रेशनसाठी ब्लॅक वॉटर अर्थात ज्याला एल्काईन वॉटर म्हटलं जातं ते पाणी पितो. हे नैसर्गिक स्वरूपात मिळणारे बायोकार्बोनेटयुक्त पाणी असून बरेचदा हेच पाणी पित असल्याचे सांगितले.