मऊ (उत्तर प्रदेश) – मुख्तार अन्सारी रुग्णवाहिका प्रकरणात उत्तर प्रदेश पोलिसांनी मंगळवारी भाजप नेत्या डॉ अलका राय आणि त्यांचा भाऊ शेषनाथ राय यांना अटक केली आहे.
मुख्तार अन्सारीला कारागृहातून पंजाब न्यायालयात नेण्यासाठी रुग्णवाहिकेचा वापर केल्याप्रकरणी पोलिसांनी अन्सारी आणि अन्य 12 जणांविरुद्ध गुंडा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
अटक करून अलका राय आणि तिचा भाऊ शेषनाथ राय या दोन आरोपींना पोलिसांनी मऊ येथून बाराबंकी येथे नेण्यात आले.पंजाबमधील रोपार तुरुंगात असताना राय यांनी मुख्तार अन्सारी याला ऍम्ब्युलन्स सुविधा पुरवल्याच्या संबंधातील हे प्रकरण आहे. विशेष म्हणजे अन्सारी सध्या बांदा कारागृहात बंद आहेत.
उत्तरप्रदेशात योगी सरकार दुसऱ्यांदा सत्तेवर आल्यानंतर भाजप नेत्यावर करण्यात आलेल्या कारवाईचे हे पहिलेच प्रकरण आहे.