BJP Candidates List for Lok Sabha Election 2024 : भारतीय जनता पक्षाने 2024 च्या लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजवले आहे. पक्षाने शनिवारी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी पत्रकार परिषद घेत याबदल माहिती दिली. त्यांनी सांगितले की, 16 राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधील 195 जागांसाठी उमेदवार निश्चित करण्यात आले आहेत. उर्वरित जागांसाठी मंथन सुरू आहे.
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे म्हणाले, गेल्या काही दिवसांत आम्ही एनडीएचा विस्तार करण्याचे काम केले. देशात पुन्हा एकदा मोदी सरकार स्थापन होईल, असा आम्हाला विश्वास आहे. सर्वांच्या मनातून एकच आवाज येत आहे की पुन्हा एकदा मोदी सरकार. काही लोकसभा मतदारसंघ आणि राज्यांतील मतदानानंतर काही नावे पक्षाच्या हायकमांडकडे पाठवण्यात आली होती. ज्यावर केंद्रीय निवडणूक समितीने चर्चा केली.
या यादीत 34 केंद्रीय आणि राज्यमंत्र्यांचीही नावे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीतून निवडणूक लढवणार आहेत. अमित शहा गांधीनगरमधून निवडणूक लढवणार आहेत. भाजपने अरुणाचल पश्चिममधून किरेन रिजिजू यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्याचबरोबर केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया मध्य प्रदेशातील गुना येथून निवडणूक लढवणार आहेत.
Bansuri Swaraj : त्याचबरोबर, याशिवाय दिवंगत भाजपाच्या नेत्या आणि माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या कन्येलाही लोकसभेचे तिकीट देण्यात आले आहे. दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी यांचे तिकीट रद्द करण्यात आले आहे. त्यांच्या जागी दिवंगत सुषमा स्वराज यांच्या कन्या बन्सुरी स्वराज यांना पक्षाने तिकीट दिले आहे. ( BJP fields Sushma Swaraj’s daughter Bansuri Swaraj from New Delhi constituency ) बन्सुरी स्वराज दिल्ली येथून निवडणूक लढवणार आहेत.
भोपाळमधून साध्वी प्रज्ञा यांचे तिकीट रद्द करण्यात आले आहे, आता त्यांच्या जागी आलोक शर्मा निवडणूक लढवणार आहेत. त्याचवेळी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान विदिशामधून निवडणूक लढवणार आहेत. शिवराज सिंह चौहान हे सध्या मध्य प्रदेश विधानसभेचे सदस्य आहेत.
कोणत्या राज्यातून किती जागांसाठी उमेदवार केले जाहीर?