BJP Candidates List for Lok Sabha Election 2024 : भारतीय जनता पक्षाने 2024 च्या लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजवले आहे. पक्षाने शनिवारी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी पत्रकार परिषद घेत याबदल माहिती दिली.
त्यांनी सांगितले की, 16 राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधील 195 जागांसाठी उमेदवार निश्चित करण्यात आले आहेत. उर्वरित जागांसाठी मंथन सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीतून निवडणूक लढवणार आहेत. या यादीत 34 केंद्रीय आणि राज्यमंत्र्यांचीही नावे आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीतून निवडणूक लढवणार आहेत. अमित शहा गांधीनगरमधून निवडणूक लढवणार आहेत. याशिवाय दिवंगत सुषमा स्वराज यांच्या कन्येलाही लोकसभेचे तिकीट देण्यात आले आहे.
मात्र पहिल्या यादीमध्ये महाराष्ट्राचा समावेश नाही त्यामुळे आता मोठा सस्पेन्स वाढला आहे. पहिल्या यादीमध्ये 16 राज्यांची यादी जाहीर करण्यात आली असली तरी महाराष्ट्रातील एकही उमेदवाराचं नाव नाही.
भाजपच्या पहिल्या यादीत काय आहे विशेष?
(A) 195 नावांची घोषणा
(B) यादीत 34 केंद्रीय आणि राज्य मंत्र्यांची नावे
(C) 28 महिलांना संधी
(D) 47 तरुण उमेदवार, ज्यांचे वय 50 वर्षांपेक्षा कमी आहे
(E) अनुसूचित जातीतील 27 नावे
(F) अनुसूचित प्रवर्गातील 18 उमेदवार
(E) इतर मागास प्रवर्गातील 57 नावे
कोणत्या राज्यातून किती जागांसाठी उमेदवार केले जाहीर?
विनोद तावडे म्हणाले की, उत्तर प्रदेशातून 51, पश्चिम बंगालमधून 26, मध्य प्रदेशातून 24, गुजरातमधून 15, राजस्थानमधून 15, केरळमधून 12, तेलंगणातून 9, आसाममधून 11, झारखंडमधून 11, छत्तीसगडमधून 11, दिल्लीतून 11 , जम्मू-काश्मीरमधील पाच, उत्तराखंडमधील तीन आणि अरुणाचल, गोवा, त्रिपुरा, अंदमान-निकोबार आणि दमण आणि दीवमधील प्रत्येकी एका जागेसाठी उमेदवार निश्चित करण्यात आले आहेत.