Lok Sabah Election 2024 : लोकसभा निवडणूक 2024 काही दिवसांवर आली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केलीये. अश्यातच आज भाजपने उमेदवारांच्या नावांची पहिली यादी जाहीर केली आहे.
ही पाहिली यादी जाहीर करताना पक्षाचे नेते विनोद तावडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 2024 लोकसभा निवडणूक उत्तर प्रदेशमधील वाराणसीतून येथून लढणार असल्याची माहिती दिली आहे. तर केंद्रीय गृह मंत्री अमित शहा हे गांधीनगर मधून निवडणूक लढणार आहेत. या यादीत 34 केंद्रीय आणि राज्यमंत्र्यांचीही नावे आहेत.
लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार ठरवण्याबाबत भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची दोन दिवसांपूर्वी 29 फेब्रुवारीला बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत लोकसभा निवडणुकीसाठीचे उमेदवार ठरविण्याबाबत चर्चा झाली होती.
बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, भाजपाध्यक्ष जेपी नड्डा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते. रात्री उशिरा 3 वाजेपर्यंत ही बैठक पार पडली होती. या बैठकीनंतर आज भाजपकडून अधिकृत पत्रकार परिषद घेऊन उमेदवारांची घोषणा करण्यात आली.