Bihar Lok Sabha 2024: बिहारमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी एनडीएमध्ये जागांची विभागणी झाली आहे. भाजप 17 जागांवर तर जेडीयू 16 जागांवर निवडणूक लढवणार आहे. चिराग पासवान यांच्या एलजेपी (आर) पक्षाला 5 जागा, जीतन राम मांझी यांच्या एचएएम पक्ष आणि उपेंद्र कुशवाहा यांच्या आरएलएम पक्षाला प्रत्येकी 1 जागा मिळाली आहे. एचएएमला गया आणि उपेंद्र कुशवाह यांच्या आरएलएमला काराकाटची जागा देण्यात आली आहे. सोमवारी दिल्लीत ही घोषणा करण्यात आली. बिहामध्ये लोकसभेच्या एकूण 40 जागा आहेत. (Bihar Lok Sabha 2024: NDA seat allocation announced; BJP will contest on 17 seats and JDU on 16 seats)
यादरम्यान सर्वात धक्कादायक बाब म्हणजे चिराग पासवान यांचे काका पशुपती पारस यांच्या पक्ष आरएलजेपीला एकही जागा देण्यात आलेली नाही. पत्रकार परिषदेलाही त्यांच्या पक्षाचा एकही नेता उपस्थित नव्हता.
जागावाटपात 7 खासदारांची तिकिटे कापली –
एनडीएमध्ये जागावाटप झाल्यानंतर यावेळी शिवहर, हाजीपूर, गया, काराकाट, समस्तीपूर, नवाडा, सीतामढी या सात लोकसभेच्या जागांसाठी नवे उमेदवार असतील हे निश्चित झाले आहे, कारण ज्या पक्षाचा खासदार येथे आहे त्याला ती जागा मिळालेली नाही. नवादा ही जागा भाजपने स्वतःकडे ठेवली आहे, याआधी ही जागा एलजेपीकडे होती. त्याचवेळी, गया आणि काराकाट जागा जेडीयूकडून मांझी यांच्या पक्ष हिंदुस्थान अवाम मोर्चा आणि उपेंद्र कुशवाह यांच्या पक्ष राष्ट्रीय लोक मोर्चाला देण्यात आल्या आहेत. तसेच शिवहर ही जागा भाजपकडे होती, यावेळी ती जेडीयूला देण्यात आली आहे.
सध्या या जागांवर शिवहरमधून रमा देवी, हाजीपूरमधून पशुपती पारस, गयामधून विजय मांझी, काराकाटमधून महाबली सिंह, समस्तीपूरमधून प्रिन्स राज, नवादामधून चंदन सिंह आणि सीतामढीमधून सुनील कुमार पिंटू हे खासदार आहेत.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत एनडीए बिहारमध्ये 40 पैकी 40 जागा जिंकेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला आहे.
बिहारमध्ये 7 टप्प्यात निवडणुक –
बिहारमध्ये लोकसभेच्या 40 जागांसाठी सात टप्प्यांत निवडणुका होणार आहेत. तर 4 जूनला निकाल लागणार आहे. गेल्या वेळीही सात टप्प्यात मतदान झाले होते. यावेळी फक्त तारखा बदलल्या असून प्रत्येक टप्प्यातील जागा सारख्याच राहिल्या आहेत.