मुंबई – राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या (NCP) स्थापनेत मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचे मोठ योगदान आहे. त्याचप्रमाणे पक्षाच्या सर्व कामाची जबाबदारी बॅकस्टेजला राहून समीर भुजबळ (sameer bhujbal) यांनी पार पाडली. यामुळे मुंबई अध्यक्षपदी समीर भुजबळ यांची निवड करण्यात आली असून, या पदाची जबाबदारी सक्षमपणे पार पाडतील असा विश्वास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. समीर भुजबळ हे छगन भुजबळ यांच पुतणे व नाशिकचे माजी खासदार आहेत.
मुंबईतील गरवारे क्लब हाऊस येथे अजित पवार गटाच्या झालेल्या बैठकीत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते व मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आला.
अजित पवार म्हणाले, मुंबई अध्यक्षपदी समीर भुजबळ यांची निवड झाली ही अतिशय आनंदाची बाब आहे. समीर भुजबळ यांनी खासदार म्हणून अतिशय उत्तमरीत्या आपली जबाबदारी पार पाडली. विकासाची अनेक कामे त्यांनी नाशिकमध्ये केली. त्यांना मुंबई शहरातील देखील बारकावे माहिती आहे.
गेल्या 25 वर्षात अनेक प्रसंगामध्ये एक व्हिजन घेऊन काम करून यशस्वी जबाबदारी त्यांनी पार पाडली. त्यांच्या रूपाने पक्षाकडे एक व्हिजन असलेले, अनुभवी युवा नेतृत्व आपल्याला मिळाले आहे. ते मुंबई शहरात अधिक लक्ष देऊन मुंबईत क्रांती घडविण्याचे काम त्यांच्याकडून होईल. त्यांच्याकडून मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (Sameer Bhujbal as Mumbai President of NCP)