मुंबई : ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाने पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटचे संचालक झेड. एस.पूनावाला यांच्यावर मोठी कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
पनामा पेपर प्रकरणात झेड. एस. पूनावाला यांचे काही व्यवहार संशयास्पद आढळले होते. याच प्रकरणी ईडीने त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. पूनावालांची मुंबईतील सीजे हाऊसमधील ४१.६४ कोटी रुपये किमतीच्या तीन स्थावर मालमत्ता जप्त करण्यात येत आहेत. फेमा कायद्या अंतर्गत ही कारवाई करण्यात आली.
The Enforcement Directorate (ED) seized three immovable properties located at Ceejay house, Worli, Mumbai worth Rs 41.64 Crore under the provisions of FEMA in its investigation against Zavareh Soli Poonawalla and his family members. The ED is investigating a case of misuse of… pic.twitter.com/CmpT0mv66u
— ANI (@ANI) May 8, 2023
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, सक्तवसुली संचालनालयाने पनामा पेपर्स प्रकरणात संशयास्पद व्यवहार केल्याप्रकरणी झेड.एस.पूनावाला आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांविरोधात तपास केला.
ईडीने फेमा कायद्यातील तरतुदींनुसार, पूनावाला यांची मुंबईच्या वरळी येथील सीजे हाऊसमधून ४१.६४ कोटी रुपयांच्या तीन स्थावर मालमत्ता जप्त केल्या.या प्रकरणाचा अधिक तपास ईडीकडून केला जात आहे.