Cloud Burst Sikkim : सिक्किममध्ये (Sikkim) ढगफूटी झाल्याने अचान पूरस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, या पूरात लष्कराचे २३ जवान बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या जवानांना शोधण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे.
सिक्किमच्या (Sikkim) उत्तर भागातील ल्होनक तलावावर ढगफुटी झाल्याने तीस्ता नदीच्या पाण्याची पातळी अचानक वाढली. ज्यामुळे अनेक भागात पाणी शिरले आहे.
23 army personnel have been reported missing due to a flash flood that occurred in Teesta River in Lachen Valley after a sudden cloud burst over Lhonak Lake in North Sikkim: Defence PRO, Guwahati https://t.co/zDabUMrCaI pic.twitter.com/uWVO1nsT2T
— ANI (@ANI) October 4, 2023
पूर परिस्थितीनंतर चुंगथांग धरणातून पाणी सोडल्यानंतर खालच्या भागात देखील पाण्याची पातळी १५ ते २० फूटांपर्यंत वाढली. यामुळे सिंगतमजवळ बारदांग येथे लष्कराची वाहने वाहून गेले. यासोबतच २३ जवान देखील बेपत्ता आहेत.
सिक्कीम (Sikkim) मधील तीस्ता नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. तिस्ता नदीला आलेल्या पुरामुळे सिक्कीममधील (Sikkim) सिंगथम फूटब्रिजही कोसळला आहे. जलपाईगुडी प्रशासनाने तीस्ता नदीच्या खालचा भाग रिकामा करण्यास सुरुवात केली आहे. सर्वांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला असून नदीकाठावरून प्रवास करणे टाळावे.