चिपळूण : उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्या चिपळूणमधील घरावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. त्यांच्या चिपळूणमधील घरासमोर दगड, क्रिकेटचे स्टम्प आणि काचेच्या बाटल्या सापडल्यामुळे स्थानिक परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, भास्कर जाधव यांच्या घरावरील हल्ल्याच्या प्रयत्नाच्या पार्श्वभूमीवर भास्कर जाधव यांच्या घरासमोर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, हा हल्ला राजकीय कोणी आणि का केला? हे अद्याप समजू शकले नाही.