मुंबई – कन्नड चित्रपटसृष्टीतील छोट्या बजेटचा चित्रपट ‘कांतारा’ सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरत आहे. दक्षिणेपासून ते हिंदी सिनेसृष्टीतील सर्वत्र जण याच कौतुक होत आहे.बॉलीवूडचे निर्माते-दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी एकामागून एक ट्विट करून कांताराचे भरभरून चित्रपटाचे कौतुक केले आहे, आतासेच आपल्या ट्विटच्या माध्यमातून राम गोपाल वर्मा यांनी बॉलीवूडला टोलाही लगावला आहे.
राम गोपाल वर्मा आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, ‘कांताराद्वारे एक अद्भुत धडा दिल्याबद्दल ऋषभ शेट्टीचे खूप खूप आभार आणि संपूर्ण इंडस्ट्रीने तुम्हाला या धड्यासाठी ट्यूशन फी दिली पाहिजे. आपल्या पुढच्या ट्विटमध्ये राम गोपाल वर्मा यांनी लिहिले की,बिग बजेट निर्मात्यांची या चित्रपटामुळे झोप उडाली आहे. २००..३००.. ५०० कोटी कमावणाऱ्या चित्रपट निर्मात्यांसाठी कांतारा हा हार्ट अटॅकशिवाय कमी नाही. असं म्हणत राम गोपाल वर्मा यांनी बॉलिवूडच्या बिग बजेट चित्रपटांना टोला लगावला आहे.
Hey @shetty_rishab thank you for the wonderful lesson called #Kantara All Film industry people will need to pay you tuition fees🙏🙏🙏
— Ram Gopal Varma (@RGVzoomin) October 18, 2022
In the film industry now , @Shetty_Rishab is like a Shiva multiplied by Guliga Daiva and the villains are the 300 cr , 400 cr , 500 cr budget film makers who are being killed by a heart attack called #Kantara collections
— Ram Gopal Varma (@RGVzoomin) October 18, 2022
‘कांतारा’ अजूनही थिएटरमध्ये धुमाकूळ घालत आहे. केवळ 16 कोटी खर्चून बनलेला हा चित्रपट साऊथनंतर आता हिंदीतही चांगली कमाई करत आहे. कन्नड भाषेत बनलेला हा चित्रपट आता हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषेतही प्रदर्शित झाला आहे. सुरुवातीच्या आकडेवारीनुसार या चित्रपटाची एकूण कमाई आता 118.09 कोटींवर गेली आहे.