नवी दिल्ली : दिल्लीतील एम्स रुग्णालयाला भीषण आग लागल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. दरम्यान, अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. एका वृत्तसंस्थेने एक ट्वीट करत या संदर्भात माहिती दिली आहे.
वृत्तसंस्थेने ट्वीटमध्ये, ‘दिल्लीतील एम्स रुग्णालयाच्या इमारतीला आग लागली आहे.’ असे सांगण्यात येत आहे. त्यासोबत मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील एम्सच्या एंडोस्कोपी कक्षात आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दिल्ली अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत, असे म्हटले आहे.
VIDEO | Fire breaks out in a building of AIIMS, Delhi. More details are awaited. pic.twitter.com/sYWspfzZEN
— Press Trust of India (@PTI_News) August 7, 2023
दिल्ली एम्सच्या आपत्कालीन वॉर्डजवळ भीषण आग लागली. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. सुमारे 11.54 वाजताच्या सुमारास आग लागल्याची माहिती समोर येत आहे.
दिल्लीतील एम्स रुग्णालयात देशभरातील रुग्ण उपचारासाठी येत असतात. यासोबतच येथे विदेशातूनही रुग्ण उपचारासाठी येत असतात. दिल्लीतील एम्स रुग्णालयात दररोज सुमारे 12 हजार रुग्ण उपचार घेतात.