मुंबई – माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या निवासस्थानी सर्वात विषारी जातीचा कोब्रा साप आढळला आहे. रविवारी मातोश्री बंगल्यावरील कर्मचाऱ्यांना हा साप दिसल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. मात्र सर्पमित्राला बोलावून सापाला रेस्कू करण्यात आले. त्यानंतर या सापाला जंगलात सोडून देण्यात आले. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
रविवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास हा कोब्रा साप मातोश्रीच्या परिसरामध्ये आढळला होता. त्यानंतर तातडीने सर्पमित्राची मदत मागविण्यात आली. त्यावेळी हा साप पाण्याच्या टाकीमागे बसलेला आढळला. मात्र वेळीच सापला पकडून जंगलात सोडून देण्यात आले. साप पकडल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सर्पमित्र अतुल कांबळे आणि रोशन शिंदे यांचे आभार मानले. हा ‘कोब्रा’ या विषारी जातीचा नाग असून त्याची लांबी अंदाजे 4 फूट होती.
ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी आढळला कोब्रा जातीचा विषारी साप #Matoshree #Kobra #Viralvideo #म pic.twitter.com/HPAq7u04JL
— Harish Malusare (@harish_malusare) August 7, 2023
यापूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या भांडूपमधील घरात अचानक साप निघाला होता. यावेळी राऊत हे नेहमीप्रमाणे पत्रकार परिषद घेत होते. यादरम्यान सकाळच्या सुमारास साप निघाल्याची घटना घडली. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. पत्रकार परिषद सुरू असतानाच संजय राऊत यांच्या अगदी खुर्चीच्या जवळच साप आल्याची घटना घडली. पांदीवड प्रकारचा हा बिनविषारी साप होता, यानंतर, सर्पमित्राला बोलावून हा साप पकडण्यात आला आणि सर्पमित्राने बॅगमध्ये घालून साप नेला. मात्र, या घनटेची पत्रकारांमध्ये आणि माध्यमांत चांगलीच चर्चा रंगली होती.