मुंबई – लाखो वैष्णवांचे श्रद्धास्थान आणि संबंध महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेलं पंढरपूर मधील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सकाळच्या काकड आरती आणि नित्यपूजेनंतर विठ्ठल-रुक्मिणीला पारंपरिक दागिन्यांचा साज चढवून सुंदर पोशाख परिधान केला आहे.
त्यानंतर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने पूजेचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर गेले आहेत. मंदिर समितीच्या वतीने ट्विटरवर शेअर केलेले फोटो बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ट्विटर हॅंडलवरुन पोस्ट करत प्रार्थना केली आहे.
T 4158 – 🚩🚩🚩
*श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता दर्शन*
मंगळवार दि- ११ जानेवारी २०२२
🌹🌹नित्य पुजा
काकडा आरती 🙏
राम कृष्ण हरी 🚩🚩🚩 pic.twitter.com/3fMWOtK6Lf— Amitabh Bachchan (@SrBachchan) January 11, 2022
“श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता दर्शन मंगळवार दि. ११ जानेवारी २०२२ नित्य पुजा काकडा आरती राम कृष्ण हरी..” म्हणत अमिताभ बच्चन यांनी विठ्ठल-रुक्मिणीचे फोटो ट्विट केले आहेत. त्यानंतर अनेकांनी बिग बींच्या ट्विटला लाईक करत कमेंट सुद्धा केली आहे.
Vithal vithal jai hari vithal 🙏🏽
— Supriya Sule (@supriya_sule) January 11, 2022
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार ‘सुप्रिया सुळे’ यांनी सुद्धा अमिताभ बच्चन यांच्या शेअर केलेल्या फोटोवर लाईक करत कमेंट केली आहे. सुप्रिया सुळे यांनी फोटोवर “विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल!!’ अशी कमेंट केली आहे.