अभिनय आणि कलेच्या जोरावर बॉलीवूडमध्ये एक वेगळे स्थान निर्माण करणारा अभिनेता आयुष्मान खुरानाने त्याचे आणखी एक स्वप्न पूर्ण केले आहे. आयुष्मानने मुंबईत 19 कोटींचा अपार्टमेंट खरेदी केले आहे.
आयुष्मान खुराना यांचा नवीन अपार्टमेंटबद्दल सांगायच झाले तर तिथे 4 वाहनांसाठी पार्किंगची जागा आहे. हे अपार्टमेंट 4027 स्क्वेअर फूट जागेवर बांधले आहे. आयुष्मान पत्नी ताहिरा कश्यप आणि दोन्ही मुलांसह या अपार्टमेंटमध्ये शिफ्ट होणार आहे.
वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास आयुष्मान ‘डॉक्टर जी’मध्ये दिसणार आहे. ‘डॉक्टर जी’मध्ये आयुष्मान आणि रकुल प्रीत मुख्य भूमिकेत आहेत.
तसेच आयुष्मानने चंदीगड करे आशिकी हा चित्रपट काही दिवसांपूर्वी रिलीज झाला आहे आणि त्याला चांगला प्रतिसाद देखील भेटला आहे. यापूर्वी, तो “गुलाबो सिताबो’मध्ये झळकला होता. यात आयुष्मानसोबत अमिताभ बच्चन यांनी मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळला होता.