नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील सोपोर भागात रात्रभर जवान व दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत अखेर लष्कर ए तोयबाच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले असल्याचे सांगण्यात येत आहे. या दोन दहशतवाद्यांमध्ये एकजण हा लष्कर-ए-तोयबाच्या टॉपच्या कमांडर असल्याचीही माहिती समोर आली आहे.
बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर भागातील वारपोरा गावात गुरुवारी रात्री चकमक सुरू झाली होती. या कारवाईत ठार करण्यात आलेला एक दहशतवादी फयाज वार हा लष्कर-ए-तोयबाचा टॉपचा कमांडर होता. तो जवान व नागरिकांवर झालेल्या अनेक दहशतवादी हल्ल्यांसाठी देखली जबाबदार होता.
Two terrorists of proscribed terror outfit LeT neutralized during the Sopore encounter. One of them Fayaz War was involved in several attacks & killings of civilians and security forces personnel. He was the last perpetrator of violence in north Kashmir: IGP Kashmir to ANI pic.twitter.com/4ZVLhbND0n
— ANI (@ANI) July 23, 2021
जवानांनी चकमकीदरम्यान एका दहशतवाद्यांचा काल रात्री उशीरा खात्मा केला. तर, आज पहाटे दुसऱ्या दहशतवाद्याला ठार केले असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, सध्या परिसरात शोधीमोहीम सुरू आहे.
या अगोदरही जम्मू-काश्मीरच्या शोपियान येथे सुरक्षा दलाच्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाच्या एका टॉप कमांडरला ठार करण्यात आले होते. हा दहशतवादी याआधी जम्मू-काश्मीर पोलिसात होता, त्याने ४ वर्षांपूर्वी नोकरी सोडली होती.
दक्षिण काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात रात्रीच्या चकमकीत इशफाक डारसह दोन दहशतवादी ठार झाले. त्या अगोदर दोन दिवसांपूर्वी श्रीनगरमध्ये अशाच प्रकारच्या कारवाईत दोन दहशतवादीह ठार झाले होते.