मेष : ग्रहांची अनुकूलता राहील. व्यवसायात कामाचे प्रमाण चांगले असेल. मात्र कष्ट प्रमाणाबाहेर करावे लागतील.
वृषभ : नवीन कामे हाती घेण्यापूर्वी त्याला लागणाऱ्या वेळेचा अंदाज घ्या व त्याप्रमाणे कामाचे नियोजन करा.
मिथुन : पैशाची बाजू चांगली असेल. नोकरीत वरिष्ठांना कामापुरती तुमची आठवण येईल.
कर्क : मूड बघून तुम्ही तुमच्या मागण्या मान्य करून घ्या. सवलतींचा लाभ घ्या. मनोकामना पूर्ण होतील.
सिंह : नवीन नोकरीत अडथळ्यांची शर्यंत पार करावी लागेल. घरात घरकामात बराच वेळ जाईल.
कन्या : प्रकृतीची काळजी घ्या. महिलांना कामाचा बराच उरक पडेल. व्यवसायात नवीन कामे मिळतील.
तूळ : व्यक्तींच्या वागण्याने थोडे बुचकळयात पडाल. परंतू कामाबाबत कलाटणी मिळाल्याने तुमचा हुरुप वाढेल.
वृश्चिक : कामांना सुरुवात होईपर्यंत त्यात गुप्तता पाळा. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राखण्यात यश येईल.
धनु : वरिष्ठ हवी असलेली सवलत तुम्हाला देतील. घरात आप्तेष्ट, नातेवाईक यांच्या भेटीचे योग येतील.
मकर : पैशाचा अपव्यय टाळा. मंगलकार्याची नांदी घरात होईल. आवडत्या छंदात वेळ मजेत घालवता येईल.
कुंभ : कामाचे प्रमाण वाढल्याने तुमची उमेदही वाढेल. जुनी येणी वसुल झाल्याने चार पैसे हातात येतील.
मीन : केलेल्या कामाचे वरिष्ठ कौतुक करतील. जोडधंद्यातून विशेष कमाई करता येईल. मानसिक समाधान मिळेल.