कार्ला, (वार्ताहर) – मावळ तालुक्यातील शिलाटणे ग्रामपंचातीच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या विकास कामांसाठी मावळचे आमदार सुनील शेळके यांनी उपलब्ध केलेल्या १ कोटी ३९ हजार रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे.
या वेळी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष बाळासाहेब भानुसघरे, सरपंच गुलाब आहिरे, उपसरपंच सोनाली येवले, ग्रामपंचायत सदस्या माजी उपसरपंच कांचन भानुसघरे, निर्मला भानुसघरे, अश्विनी भानुसघरे, जनाबाई कोंडभर, रुपाली कोंडभर, सदस्य शरद आहिरे, माजी सरपंच पोपटराव भानुसघरे, ज्ञानदेव भानुसघरे, हेमंत भानुसघरे,
पोलीस पाटील चंद्रकांत आहिरे, संतोष भानुसघरे, अनिल भानुसघरे, पांडुरंग येवले, रामदास भानुसघरे, दत्तात्रय भानुसघरे, नवनाथ कोंडभर, नाथा कोंडभर, नितेश चव्हाण, नंदु मोरे, भरत येवले, सुशिल येवले, प्रदीप भानुसघरे, पांडुरंग भानुसघरे, सुदाम भानुसघरे, सीमा भानुसघरे, तानाजी भानुसघरे, बाबाजी भानुसघरे, नारायण गोरे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन भरत येवले यांनी केले. आभार संतोष भानुसघरे यांनी मानले.