लोणावळा, (वार्ताहर) – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम त्वरीत सुरू करा, अशी मागणी आरपीआयच्या वतीने लोणावळा नगर परिषदेकडे करण्यात आली आहे.
श्रीमान बाबासाहेब डहाणूकर हॉस्पिटलसमोरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात काम सुरू आहे. या कामामुळे रुग्णालयात वाहनतळाचा प्रश्न निर्माण होणार असून, रुग्णवाहिका वळविण्यासाठी अडचण निर्माण होणार असल्याने या कामाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी आमदार सुनील शेळके यांनी केली होती.
शेळके यांच्या मागणीमुळे हे काम थांबविण्याचे आदेश मुख्याधिकारी साबळे यांनी दिले होते. हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने आरपीआयने निषेध करीत काम त्वरीत सुरू करण्याची मागणी केली.
यावेळी सूर्यकांत वाघमारे गणेश गायकवाड, अशोक सरवते, यमुना साळवे, मालन बनसोडे, नीता गायकवाड, रोहिणी देसाई, समीक्षा कांबळे, श्वेता सोनवणे, अंकुश सोनवणे, सिद्धार्थनगर, वळवण येथील रमामाता महिला मंडळ, शिल्पकारनगर तरुण मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.