मुंबई – बॉलीवूडचा चॉकलेट अभिनेता कार्तिक आर्यन आपल्या चाहत्यांना खूश करण्याची एकही संधी सोडत नाही, त्यामुळेच त्याची फॅन फॉलोइंगही दिवसेंदिवस वाढत आहे.
कार्तिक आर्यन कितीही घाईत असला तरी जेव्हा एखादा चाहता त्याला सेल्फीची विनंती करतो तेव्हा तो त्याला कधीही निराश करत नाही. त्याच्या चाहत्यांना प्रेमाने भेटण्यासोबतच कार्तिक त्याच्या साधेपणासाठीही ओळखला जातो. अलीकडेच त्याने खुलासा केला होता की तो आजही अनेकवेळा इकॉनॉमी क्लासमध्ये प्रवास करतो आणि त्याचा नुकताच व्हायरल झालेला व्हिडिओही तेच दिसते आहे.
अभिनेत्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो फ्लाइटमध्ये दिसत आहे. विशेष म्हणजे या व्हिडिओमध्ये कार्तिक बिझनेस क्लासमध्ये नाही तर इकॉनॉमी क्लासमध्ये प्रवास करत आहे. फ्लाइटमध्ये बसलेल्या लोकांनी कार्तिकला पाहताच ते आश्चर्यचकित झाले सर्व चाहते त्याच्या सोबत फोटो क्लिक करू लागले.
त्याचवेळी काही लोक कार्तिकसोबत सेल्फी घेतानाही दिसत आहेत. कार्तिक देखील फ्लाइटमध्ये उपस्थित असलेल्या लोकांचे मोठ्या प्रेमाने स्वागत करतोय. कार्तिक आर्यनचा हा व्हिडीओ सध्या सर्वत्र गाजला आहे, जो पाहिल्यानंतर यूजर्सही अभिनेत्याचे जोरदार कौतुक केले आहे.
कार्तिक आर्यनचा हा व्हिडिओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यामध्ये अभिनेता पांढरा शर्ट, पिस्ता ग्रीन टाय आणि निळ्या ब्लेझरमध्ये दिसत आहे. दरम्यान, याआधीही कार्तिक अनेकदा त्याच्या साध्या आणि प्रेमळ शैलीमुळे चर्चेत राहिला आहे.
अलीकडेच अभिनेता विमानतळावर दिसला. कार्तिक नॅशनल यूथ कॉन्फरन्स 2022 मध्ये सहभागी होण्यासाठी जोधपूर, राजस्थानला पोहोचला. कार्यक्रमानंतर कार्तिक जोधपूर विमानतळावर पोहोचताच एका तरुण चाहत्याने त्याला गेटबाहेरून नावाने हाक मारली. कार्तिकनेही त्याच्या छोट्या चाहत्याला निराश केले नाही आणि त्याच्यासोबत फोटो क्लिक केले. कार्तिकचा ‘भूल भुलैया 2’ रिलीज झाल्यापासून त्याच्या फॅन फॉलोइंगमध्ये कमालीची वाढ झाली आहे.