मुख्यमंत्र्याकडे करणार पालिकेची तक्रार
पुणे : शहरातील प्राणी व भटक्या कुत्र्यांच्या हॉस्पिटल्ससाठी मिशन पॉसीबल या संस्थेस 33 वर्षांच्या कराराने मनपाची रामटेकडी येथील जागा भाड्याने देण्याचा प्रस्ताव काल स्थायी समितीच्या सभेत मान्य झाला.
हडपसर विधानसभा मतदारसंघात अनेक त्रासदायक प्रकल्प सदद्यस्थितीत असून प्राण्यांच्या हॉस्पिटल मुळे हडपसर मतदारसंघातील नागरिकांच्या समस्येत भर पडनार आहे .मनपा प्रशासनाने हडपसरच्या नागरिकांच्या संयमाचा अंत बघू नये असा इशारा शिवसेना ( शिंदे गट) चे शहर प्रमुख नाना भानगिरे यांनी दिला आहे.
हडपसरला प्राण्यांच्या ऐवजी जिवंत माणसांसाठी मनपाच्या वतीने हॉस्पिटल उभारावे अशी आमची मागणीही त्यांनी केली आहे
प्रशासनाने धोरणात्मल निर्णय घेऊ नये असे अलिखित संकेत असताना अधिकाराचा दुरुपयोग करून प्रशासन हडपसर विधानसभा मतदारसंघावर हा प्रकल्प लादत आहे .आमचा या प्रकल्पास तीव्र विरोध आहे.
सेनेच्या व स्थानिकांच्या या प्रकल्पा विरुद्ध भावना प्रक्षुब्ध आहेत. प्रशासनाने स्थायी समिती ने मान्य केलेल्या प्रस्तावाचा फेरविचार करावा अशी लेखी मागणी आपणा कडे तळमळीने करीत आहोत .
सदर प्रकल्प हडपसर विधानसभा मतदारसंघावर लादल्यास शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल याची प्रशासनाने नोंद घ्यावी असा इशाराही भानगिरे यांनी दिला असून याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार करणार असल्याचेही ते म्हणाले.