पुणे- कोयता घेऊन परिसरात फिरत असलेल्या एका गुन्हेगारास भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. त्याच्यावर गुन्हा दाखल करुन त्याने कोयता कोणत्या उद्देशासाठी बाळगला होता याचा तपास करण्यात येत आहेत.
भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील तपास पथकातील अधिकारी वाहन चोरी व जबरी चोरीस प्रतिबंधात्मक कारवाई करत असताना पोलीस कर्मचारी विक्रम सांवत व अभिजित जाधव यांना बातमीदारा मार्फत कात्रज नविन वसाहत सार्वजनिक शौचालया समोर एक संशयीत इसम कोयत्या जवळ बाळगून राजरोसपणे फिरत असल्याची खबर मिळाली.
त्याआधारे सापळा रचून संशयीत सुजित सुरेश सरपाले (25 संतोषनगर, कात्रज, पुणे) याला शिताफीने ताब्यात घेतले. त्याची झटडती घेतली असता त्याच्याजवळ एक लोखंडी कोयता मिळाला. तो जप्त करत त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आला आहे.
ही कामगिरी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, गुन्हे शाखेचे अर्जुन बोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गंगाधर घावटे, पोलीस हवालदार सोमनाथ सुतार, संतोष भापकर, सर्फराज देशमुख, सचिन पवार, अभिजीत जाधव, राहुल तांबे, गणेश शेंडे, विक्रम सावंत यांच्या पथकाने केली.