भुवनेश्वर : भुवनेश्वरच्या कलिंगा स्टेडियमवर झालेल्या एफआयएच हाॅकी प्रो लीगच्या दुस-या सामन्यात रविवारी जगज्जेत्या बेल्जियमने भारताचा ३-२ असा पराभव करत विजय नोंदविला. पहिल्या सामन्यात भारताने बेल्जियमचा २-१ असा पराभव केला होता, त्याची बेल्जियमने परतफेड केली.
End of a great game as @BELRedLions emerged victorious breaking #TeamIndia's winning streak in the FIH Pro League.
🇮🇳 2-3 🇧🇪#IndiaKaGame #FIHProLeague #HockeyInvites #INDvBEL #HockeyAtItsBest pic.twitter.com/IwTpAQzRoR
— Hockey India (@TheHockeyIndia) February 9, 2020
बेल्जियमकडून अॅलेक्झांडर हेंड्रिक्सने दुस-या मिनिटाला, डी कर्पेलने १७ व्या मिनिटाला आणि मॅक्झिम प्लेनव्हाॅक्सने २६ व्या मिनिटाला गोल केले तर भारताकडून विवेकसागर प्रसादने १५ व्या मिनिटाला आणि अमित रोहिदासने १७ व्या मिनिटाला गोल केले.
या विजयासह बेल्जियमने या लीगमध्ये ६ सामन्यात १४ गुण पटकावत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे, तर भारतीय संघ ४ सामन्यात ८ गुण पटकावत दुस-या स्थानी आहे. येत्या २१ आणि २२ फेब्रुवारीला भारत आॅस्ट्रेलिया यांच्यात सामने होतील.