पुणे – भाजप आणि मनसे यांच्या युतीच्या चर्चा गेल्या काही दिवसापासून राज्यातील राजकीय वर्तुळात बघालया मिळत आहेत. आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील मनसे अध्यक्ष अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत. या भेटीआधी राज ठाकरे यांनी मनसेच्या प्रमुख नेत्यांची बैठक घेतली आहे.
मनसेच्या या बैठकीमध्ये अमित ठाकरे, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे , शिरीष सांवत, अविनाश जाधव उपस्थित होते. या बैठकीमध्ये भाजप-मनस युतीसंदर्भात रणनीतीबाबत चर्चा झाल्याची कळत आहे.
असे असले तरी चंद्रकांत पाटील यांनी राज ठाकरे यांच्या भेटीआधीच युती होण्याची शक्यता फेटाळून लावली आहे. मनसेचे इतर राज्यांबद्दलचे विचार मान्य नसल्याचे भाजप कडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे भाजप-मनसे युतीबाबत या दोन नेत्यांच्या भेटीमध्ये काय होणार हे वेळच सांगणार आहे.