शाहरुख आणि काजोलची जोडी हिट आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण अलीकडेच शाहरुखबरोबरच्या एका सिनेमासाठी तिने अद्याप होकार कळवलेला नाही. राजकुमार हिरानीने शाहरुख आणि काजोलला घेऊन एक लव्ह स्टोरी बनवण्याचा घाट घातला आहे.
मात्र अद्याप आपल्याला या सिनेमाबद्दल काहीच माहिती नाही असे काजोलने म्हटले आहे. सध्या ती बऱ्याच चांगल्या स्क्रिप्ट वाचते आहे. अनेक लोकांबरोबर ऑनलाइन मिटींगदेखील करते आहे. यापैकी एखाद्या नवीन सिनेमाला ती लवकरच होकार कळवण्याची शक्यता आहे.
राजकुमार हिरानी करत असलेल्या सिनेमामध्ये विद्या बालन, तापसी पन्नू, मनोज वाजपेयी आणि बोमन इराणी देखील असणार आहेत. काजोल सध्या नवीन प्रोजेक्ट शोधते आहे. तर शाहरुख त्याच्या “पठाण’च्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे.
शाहरुखच्या पठाणमध्ये दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहमबरोबर आता आशुतोष राणा आणि डिंपल कापडियाचीही एन्ट्री झाली आहे. “पठाण’चे शुटिंग सध्या यशराज स्टुडिओमध्ये सुरू आहे.
या गडबडीमध्ये त्याच्याकडूनही राजकुमार हिरानीच्या सिनेमाबाबत कोणताही अपडेट मिळालेला नाही. शाहरुख “पठाण’मधून रिकामा झाल्यावरच या सिनेमाबाबत काही हालचाल होऊ शकेल. तोपर्यंत काजोलचाही होकार मिळण्याची शक्यता आहे.