नवी दिल्ली – संरक्षण मंत्री राजनाथसिंह हे उद्या मॉस्को दौऱ्यावर रवाना होत आहे. त्या पुर्वी त्यांनी आज लष्कराच्या तिन्ही दलांचे प्रमुख जनरल बिपीन रावत यांच्याशी चर्चा करून चीन सीमेवरील स्थितीचा आढावा घेतला. लष्कर, हवाईदल, आणि नौदलाचे प्रमुखही यावेळी उपस्थित होते.
या बैठकीत लडाख मधील चीनच्या सीमेवरील वस्तुस्थिती संरक्षण मंत्र्यांना सादर करण्यात आली. चीन सीमेवर तणाव वाढणार नाही याची खबरदारी घेण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. मात्र त्याच वेळी चीनकडून कोणतीही आक्रमक भूमिका घेतली गेली तर त्याला जशास तसे उत्तर देण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आल्याचे सांगण्यात येते.
सीमेवरील स्थितीच्या संबंधात परस्पर निर्णय घेण्याचा अधिकार लष्कराला या आधीच देण्यात आला आहे. त्यानुसार लष्करानेहीं त्या भागात आपली सिद्धता ठेवली आहे.