नवी दिल्ली – 16 वर्षीय काम्या कार्तिकेयन जगातील सर्वांत उंच शिखर असणारे माउंट एव्हरेस्ट यशस्वीरित्या सर करून असा विक्रम करणारी सर्वांत तरुण भारतीय गिर्यारोहक ठरली आहे. भारतीय नौदलाने गुरुवारी याबाबदची माहिती दिली आहे.
नौदलाच्या प्रवक्त्यांनी जारी केलेल्या निवेदनानुसार, काम्या आणि तिचे वडील कमांडर एस. कार्तिकेयन यांनी 20 मे रोजी एव्हरेस्ट (8,849 मीटर) यशस्वी चढाई केली. या कामगिरीसह, ती जगातील दुसरी सर्वांत तरुण मुलगी आणि नेपाळमार्गे जगातील सर्वोच्च शिखर सर करणारी सर्वांत तरुण भारतीय गिर्यारोहक ठरली आहे.
यासह, काम्याने सातही खंडांतील सर्वोच्च शिखरावर चढाई करण्याच्या तिच्या मोहिमेतील सहा टप्पे पूर्ण केले आहेत, असे नौदलाने सांगितले. 7 समिट्स चॅलेंज’ पूर्ण करणारी सर्वात तरुण मुलगी होण्यासाठी आता डिसेंबरमध्ये अंटार्क्टिकामधील माऊंट विन्सन मॅसिफवर चढाई करण्याचे तिचे ध्येय आहे.