Prayagraj। उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये भाजपच्या प्रचारादरम्यान मुस्लिम महिलांशी गैरवर्तन, मारहाण आणि धमक्या दिल्याची धक्कादायक बाब समोर आलीय. या महिला लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नावाने भाजपच्या बाजूने प्रचार करत होत्या, त्यानंतर त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या होत्या अशी खळबळजनक माहिती उघड झालीय.
गंभीर परिणाम भोगावे लागतील Prayagraj।
हे प्रकरण प्रयागराजच्या करेली भागातील आहे. याठिकाणी मुस्लिम समाजातील महिला गेल्या अनेक दिवसांपासून भाजपशी जोडल्या गेल्या आहेत. हे लोक अलाहाबाद मतदारसंघातील भाजपचे उमेदवार नीरज त्रिपाठी यांचा सतत प्रचार करत आहेत. त्यामुळे या महिलांना भाजपचा प्रचार केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी देण्यात आली.
भाजपच्या प्रचाराची धमकी Prayagraj।
शेजारी राहणाऱ्या काही लोकांनी येथे राहणाऱ्या सना खान नावाच्या महिलेच्या घरात जबरदस्तीने प्रवेश केल्याचा आरोप आहे. आरोपींनी सना खान आणि तिच्या मुलीशी गैरवर्तन केले आणि भाजपचा प्रचार केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी मुस्लीम महिलांनी पोलिसांकडे तक्रार केली असून प्रयागराज पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
मुस्लिम समाजातील या महिला भाजप कार्यकर्त्यांनी नुकतीच हाताला मेहंदी लावली होती आणि यावेळी त्यांनी मेहंदीच्या माध्यमातून ‘चार सौ पार’चा नारा दिला होता. त्यामुळे आजूबाजूला राहणारे लोक संतप्त झाल्याचे सांगण्यात आले. या घटनेनंतर भाजप मुस्लिम महिला कार्यकर्त्या सना खान यांनी धमकी देणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
याप्रकरणी प्रयागराज पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे. आरोपींचा शोध सुरू आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. याप्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.