IPL 2024 (SRH vs RR Qualifier2) : – यंदाच्या आयपीएल 2024 हंगामाचे आता अखेरचे दोनच सामने बाकी आहेत. 26 मे रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यापूर्वी शुक्रवारी येथील एम.ए. चिदंबरम अर्थात चेपॉक स्टेडियमवर (सायंकाळी 7.30 वा.पासून) होणाऱ्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात राजस्थान रॉयल्स व सनराईझर्स हैदराबाद संघांसमोर करो या मरो अशी स्थिती असणार आहे.
हा सामना जो संघ जिंकेल तो थेट फायनलमध्ये प्रवेश करून कोलकाता नाईट राईडर्सला आव्हान देणार आहे. त्यामुळे दोन्हही संघांची या सामन्यात प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. यंदाच्या हंगामाता कमालीच्या फार्मात असणाऱ्या हैदराबादला पहिल्या क्वालिफायर सामन्यात कोलकाताकडून पराभव पत्करावा लागला. परंतू गुणतालिकेत पहिल्या दोन क्रमांकावर असल्याने त्यांना फायनल खेळण्याची आणखी एक संधी मिळाली. तर दुसरीकडे, गुरूवारी झालेल्या रोमांचक सामन्यात राजस्थानने रॉयल चॅलेजर्स बंगळुरूचा पराभव करत, दुसऱ्या क्वालिफायर्समध्ये स्थान मिळवले आहे. बंगळुरूवरील विजयाने नक्कीच त्यांच्या फायनलच्या आशा वाढल्या आहेत.
Ready to give it our all in 𝗤𝘂𝗮𝗹𝗶𝗳𝗶𝗲𝗿 2️⃣
See you there, @rajasthanroyals 👊#PlayWithFire #SRHvRR pic.twitter.com/vGbXwFB8BG
— SunRisers Hyderabad (@SunRisers) May 22, 2024
आयपीएलच्या इतिहासावर नजर टाकली तर हैदराबाद आणि राजस्थान यांच्यात आतापर्यंत एकूण 19 सामने खेळले गेले आहेत. यापैकी हैदराबाद संघाने 10 सामने जिंकले आहेत, तर राजस्थान संघाने 9 सामने जिंकले आहेत. याचा अर्थ येथे हैदराबाद आकडेवारीत थोडा वरचढ असला तरी राजस्थान संघ देखील मागे नाही. यंदाच्या हंगामात या दोन्ही संघांमध्ये एक सामना झाला, जो हैदराबाद संघाने अवघ्या एका धावेने जिंकला होता. त्यामुळे हा सामना चुरशीचा होणार असल्याचे स्पष्ट होत असून, त्याची उत्कंठाही शिगेला पोचली आहे.
एम.ए. चिदंबरम स्टेडियमची खेळपट्टी फिरकीला अनुकूल असल्याचे मानले जाते. त्यात यंदाच्या आयपीएलचे येथे अनेक सामने खेळले गेले आहेत. अशा स्थितीत खेळपट्टी संथ असणे स्वाभाविक आहे. पण धावा होणार नाहीत असे नाही. फलंदाजांनी आपले कौशल्य दाखवून काळजीपूर्वक खेळ केल्यास त्यांना धावा करण्याच्या भरपूर संधी मिळू शकतात. परंतु त्यांना फिरकीपटूंपासून जरा जपून राहवे लागणार आहे. येथे पहिल्या डावाची सरासरी धावसंख्या 164 धावांची आहे, तर दुसऱ्या डावाची सरासरी धावसंख्या 151 धावांची आहे. त्यामुळे हा सामना कमी स्कोअरींगचाच अपेक्षित आहे.
IPL 2024 (KKR vs SRH Qualifier 1) : कोलकाताने गाठली अंतिम फेरी, हैदराबादचा 8 गडी राखून केला पराभव…
दोन्ही संघांची अवस्था कशी?
राजस्थानने यंदाच्या आयपीएलमध्ये शानदार सुरुवात करत पहिल्या 9 पैकी 8 सामने जिंकले होते. मात्र नंतर त्यांची गाडी रुळावरून घसरली. पण एलिमिनेटरमध्ये संघाने आरसीबीविरुद्ध ज्या पद्धतीने कामगिरी केली, त्यावरून संघ पुन्हा विजयी मार्गावर परतल्याचे दिसते. हैदराबादबद्दल बोलयचे झाल्यास, संघाने संपूर्ण लीग टप्प्यात चांगली कामगिरी केली आहे. मात्र क्वालिफायर 1 मध्ये कोलकाताकडून संघाला पराभव पत्करावा लागला. अशा स्थितीत दोन्ही संघांना आपला सर्वोत्तम खेळ दाखवावा लागणार आहे.