बीड – आष्टी तालुक्यातील सांगवी (पाटण )येथे करोनाबाधित आढळलेल्या ६५ वर्षीय महिलेचा आज पहाटे मृत्यू झाला. त्यांचा मृत्यूने जिल्ह्यातील हा करोनाचा पहिला बळी ठरला असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, रविवारी आष्टी तालुक्यातील पाटसांगवी येथील सात जण करोना पॉझिटिव्ह आढळून आले होते.
संबंधित महिला मुळची पिंपळगाव (नगर) येथील रहिवासी असून मुंबईहून होती. ती सांगवी येथे नातेवाईकाकडे आली होती. उपचारादरम्यान सोमवारी पहाटे या महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
दरम्यान, अन्य सहा जणांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि करोनाचा मुकाबला करण्यासाठी सावध राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.