सावधान नागरिकांनो घरीच थांबा

"निसर्ग'मुळे मुसळधार पाऊस बरसणार असल्याने काळजी घ्यावी

पुणे – अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून त्याचे चक्रीवादळात रूपांतर झाले आहे. या वादळाचा तडाखा मुंबईसह ठाणे, पालघर तसेच पुणे परिसरात बसण्याची शक्‍यता आहे.

त्याचबरोबर पुढील दोन-तीन दिवस मुसळधार पावासाचा इशारा हवामान खात्याने दिला असून मंगळवारी (दि. 2) सायंकाळपासूनच जिल्ह्यातील काही भागात दमदार पाऊस झाला आहे.

तरी नागरिकांनी काळजी घ्यावी व शक्‍यतो घरीच बसावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.