नारायणगाव परिसरातील चौघांचा अहवाल निगेटिव्ह

नारायणगाव -येथील संशयित मृत्यू झालेल्या 75 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाच्या पत्नी व मुलीचा आणि वारूळवाडी, धनगरवाडी येथील दोन जणांचा करोना तपासणी अहवाल आज (दि. 2) निगेटिव्ह आला आहे, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा गुंजाळ यांनी दिली आहे.

मुंबई येथील भटवाडी घाटकोपर येथून पाच दिवसापूर्वी 28 मे रोजी कोल्हे मळ्यातील कावळे यांच्या सोसायटीमध्ये राहण्यासाठी आलेल्या 75 वर्षीय नागरिकाचा 30 मे रोजी करोना संशयिताचा मृत्यू झाला होता.

त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी व मुलगी यांचे 31 मे रोजी नमुने (स्वॅब) घेऊन पुणे येथे पाठविण्यात आले होते. त्यांचा तसेच वारूळवाडी आणि धनगरवाडी येथील दोन जणांचा अहवाल आज (दि. 2) सकाळी निगेटिव्ह आला आहे.

35 जण सोडले घरी
लेण्याद्री येथील कोविड केअर सेंटरमधून 31 मे रोजी पाठविण्यात आलेल्या 35 जणांचे अहवाल आज 2 जूनला निगेटिव्ह आले असून, त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.