वादळापूर्वीच शहरात पडली २० झाडे

पिंपरी – थोड्याच वेळात निसर्ग चक्रीवादळ अलिबाग जवळील समुद्र किनाऱ्यावर धडक देणार आहे. मात्र त्यापूर्वी पिंपरी-चिंचवड शहरात जोरदार वारे आणि रिमझिम पाऊस पडत आहे. वाऱ्यामुळे शहरातील २० झाडे पडली आहेत.

मंगळवारी (दि. २) दुपारपासूनच पिंपरी चिंचवड शहरात पावसाच्या जोरदार सरी अधूनमधून कोसळत आहेत. तर रात्रीपासून सुसाटय़ाच्या वाऱ्यासह पावसाची संततधार सुरू आहे. वादळी वाऱ्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील एकूण २० झाडे पडली असल्याची माहिती पिंपरी चिंचवड महापालिकेकडून प्राप्त झाली आहे.

मंगळवारपासून दिवसा पडलेली १५ झाडे ही उद्यान विभागाकडून हटविण्यात आली आहेत. तर उर्वरित पाच झाडे रात्रीच्या वेळी पडली आहेत. रहदारीला अडथळा ठरणारी पाच झाडे अग्निशामक दलाकडून दूर करण्यात आली असल्याचे मुख्य अग्निशामक अधिकारी किरण गावडे यांनी सांगितले. सर्वाधिक झाडे ही सांगवी आणि भोसरी भागात पडली असल्याची माहिती महापालिकेच्या उद्यान विभागाचे मुख्य अधीक्षक दत्तात्रय गायकवाड यांनी दैनिक ‘प्रभात’शी बोलताना दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.