नवी दिल्ली :– टी-20 विश्वचषकासह अनेक स्पर्धेत भारतीय संघाची कामगिरी निराशाजनक ठरत आहे. यासदंर्भात बीसीसीआयची आज, रविवार(1 जानेवारी 2023) एक महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत निवडकर्ते आणि संघाचे कर्णधार, प्रशिक्षक असणार आहेत. याचबरोबर राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमीचे अध्यक्ष व्हीव्हीएस लक्ष्मण हे पण या बैठकीत उपस्थित असणार आहे. या बैठकीत भारताचा कर्णाधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांची चांगलीच कानउघाडणी होण्याची शक्यता आहे.
यंदाच्या वर्षभरात भारत सर्वाधिक सामने जिंकणारा संघ ठरला. मात्र, एकही मोठी स्पर्धा संघाला जिंकता आली नाही. भारताने ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात दुबईमध्ये आशिया कप स्पर्धा खेळली. या स्पर्धेच्या सुपर 4 मध्ये भारताला पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्याकडून पराभव स्विकारावा लागला. त्यामुळे भारत या स्पर्धेच्या अंतिम फेरीतही पोहोचला नाही.
टी-20 विश्वचषकातही भारतीय संघाची निराशा झाली. ऑस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या या स्पर्धेत भारताने पहिल्याच सामन्यात पाकिस्तानवर रोमांचक विजय मिळवत दमदार सुरूवात केली. मात्र उपांत्य फेरीत इंग्लंडकडून 10 विकेट्सने पराभव पत्करावा लागल्याने भारत स्पर्धेतून बाहेर पडला. या दोन्ही मोठ्या स्पर्धा भारताने गमावल्याने रोहित-राहुलला बैठकीत प्रश्नांना सामोरे जावे लागणार आहे.
भारताने 2013मध्ये शेवटची आयसीसी ट्रॉफी जिंकली. त्या स्पर्धेत भारताचे नेतृत्व एमएस धोनीने केले होते. त्याआधी भारत 2011मध्ये घरच्या मैदानावर दुसऱ्यांदा वनडे विश्वचषक जिंकण्याची कामगिरी केली. 2013नंतर 2016 टी20 विश्वचषक, 2017 चॅम्पियन्स ट्रॉफी, 2021 कसोटी चॅम्पियनशीप आणि 2021 टी20 विश्वचषक या स्पर्धांमध्ये भारताला अगदी जवळून पराभव पत्कारावा लागली. हा सर्व स्पर्धा भारताने विराट कोहली याच्या नेतृत्वाखाली गमावल्या होत्या. त्यामुळे निवडसमितीने रोहित-राहुलवर जबाबदारी दिली. मात्र त्यांनीही निराशा केली.
Sports Calendar 2023 : येत्या वर्षात 4 विश्वचषकांचा थरार, जाणून घ्या….2023 मधील महत्त्वाच्या स्पर्धा
दरम्यान, टी-20 विश्वचषकात झालेल्या पराभवानंतर संपूर्ण निवड समिती बरखास्त करण्यात आली. ज्याचे अध्यक्ष चेतन शर्मा होते. नव्या निवडकर्त्यांची निवड न झाल्याने शर्मांवर श्रीलंकेविरुद्ध संघ निवडण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती.
चेतन शर्माचा पुन्हा अर्ज
या महिन्याच्या सुरुवातीला स्थापन करण्यात आलेल्या क्रिकेट सल्लागार समितीची नुकतीच मुंबईत बैठक पार पडली. या पॅनलमध्ये अशोक मल्होत्रा, जतीन परांजपे आणि सुलक्षणा नाईक यांचा समावेश आहे.
Cristiano Ronaldo : ख्रिस्तियानो रोनाल्डोचा नववर्षात विक्रमी करार, वर्षाला मिळणार ‘इतके’ अब्ज रूपये
या बैठकीत निवडकर्त्यांच्या पदांसाठी उमेदवारांची यादी तयार करण्यात आली. तसेच चेतन शर्मा आणि हरविंदर सिंग यांनी पुन्हा अर्ज केला आहे. तर अर्ज केलेल्या इतरांमध्ये भारताचा माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद आणि माजी यष्टीरक्षक नयन मोंगिया यांचा समावेश आहे.