नवी दिल्ली – आगामी वर्ष म्हणजेच 2023 हे क्रीडा जगतासह भारतासाठी खूप विशेष ठरणार आहे. या वर्षात क्रिकेट, हॉकी आणि फुटबॉल या खेळांमध्ये भव्य स्पर्धा पार पडणार आहेत. यात एकूण चार विश्वचषक स्पर्धांही रंगणार आहेत. यात क्रिकेट विश्वचषक, हॉकी विश्वचषक, फुटबॉल महिला विश्वचषक आणि महिला अंडर-19 क्रिकेट विश्वचषक यांचा समावेश आहे. यासह पहिली महिला इंडियन प्रीमियर लीग देखील आयोजित केली जाणार आहे.
2023 हे वर्ष भारतासाठी आणखी महत्त्वाचे ठरणार आहे. यावेळी एकदिवसीय क्रिकेट आणि हॉकी विश्वचषकाचे आयोजन भारतात होणार आहे.
Cristiano Ronaldo : ख्रिस्तियानो रोनाल्डोचा नववर्षात विक्रमी करार, वर्षाला मिळणार ‘इतके’ अब्ज रूपये
जागतिक बॉक्सिंग आणि नेमबाजी विश्वचषकाचे यजमानपदही भारताकडेच असेल. त्यामुळे हे वर्ष क्रीडा जगतासाठी आणि खासकरुन भारतासाठी खूप खास असणार आहे.
2023 मधील महत्त्वाच्या स्पर्धा –
28 मे ते 11 जून – फ्रेंच ओपन(टेनिस), ठिकाण – पॅरिस, फ्रांस
3 ते 13 जुलै – विम्बलडन ओपन(टेनिस) , ठिकाण – लंडन, इंग्लंड
20 जुलै ते 20 आॅगस्ट – महिला फीफा विश्व कप(फुटबॉल), ठिकाण-ऑस्ट्रेलिया, न्यूजीलैंड
14 ते 30 जुलै – जागतिक एक्वेटिक्स चॅम्पियनशिप (स्विमिंग), ठिकाण – फूकूओका, जपान
19 ते 27 आॅगस्ट – जागतिक एथलेटिक्स चॅम्पियनशिप (एथलेटिक्स), ठिकाण-बुडापेस्ट, हंगरी
21 ते 27 आॅगस्ट – जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिप (बॅडमिंटन ), ठिकाण – कोपेनहेगन, डेनमार्क
28 आॅगस्ट ते 10 सप्टेंबर – यूएस ओपन(टेनिस), ठिकाण – न्यूयॉर्क, अमेरिका
2 ते 17 सप्टेंबर – जागतिक वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप(वेटलिफ्टिंग), ठिकाण- रियाद, सऊदी अरब
3 ते 10 सप्टेंबर- जागतिक रोइंग चॅम्पियनशिप (रोइंग), ठिकाण – बेलग्रेद, सर्बिया
16 ते 24 सप्टेंबर- जागतिक रेसलिंग चॅम्पियनशिप (रेसलिंग कुस्ती), ठिकाण – बेलग्रेद, सर्बिया
23 सप्टेंबर ते 8 आॅक्टोबर – एशियन गेम्स (विविध-खेळ), ठिकाण -हांग्झू, चीन
13 ते 17 डिसेंबर – वर्ल्ड टूर फाइनल्स (बॅडमिंटन) , ठिकाण – घोषित नाही
घोषित नाही – एएफसी एशियन कप (फुटबॉल), ठिकाण – कतर
विशेष म्हणजे 2023 हे वर्ष महिलांसाठी आणखी खास असेल. या वर्षी प्रथमच महिला अंडर-19 क्रिकेट विश्वचषक स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर पहिल्यांदाच महिला आयपीएलचे आयोजन केले जाणार आहे. बीसीसीआयची ही महत्त्वाची स्पर्धा 5 ते 26 मार्च दरम्यान होणार आहे.