बारामती: बारामती तालुका सहकारी दूध उत्पादक संघाने दूध उत्पादक शेतक-यांसाठी खूषखबर दिले आहे. बारामती संघाकडून गाईच्या दूधाला प्र.लि. रू. ३०.५० एवढा उच्चांकी दर जाहीर करण्यात आला असल्याची माहिती चेअरमन संदीप जगताप यांनी दिली.
बारामती दूध संघाचे सध्या दररोज सरासरी २.४० लाख लिटर्स दूध संकलन होत असून, राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.अजितदादा पवार साहेब यांचे मार्गदर्शनानुसार संघाचे कामकाज चालते. सध्या गाईच्या दूधाला मोठया प्रमाणावर मागणी वाढल्यामूळे दूध प्रकल्पांकडून दूध खरेदीदरात मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे.
बारामती दूध संघाने देखील आपल्या दूध उत्पादक शेतक-यांना तेजीच्या काळात दूधाला अधिकचा दर मिळावा यासाठी संचालक मंडळाने दि. २८ रोजीच्या बोर्ड मिटींगमध्ये दूधाचे दर दि. ०१ मार्च २०२२ पासून प्रति लिटर रू.३०.५० (३.५/८.५ गुणप्रतकरीता) एवढा उच्चांकी दर जाहिर करण्यात आला. आतंराष्ट्रीय बाजारपेठेत दूध पावडर व बटरचे दरात वाढ झाली असल्याने व दूधाला मागणी वाढल्यामुळे दूध खरेदी दरात वाढ झाली आहे.
जागतिक बाजारातून दूध पावडरला अशीच वाढती मागणी राहिल्यास दूध खरेदीचे दर आणखी वाढण्याचा अंदाज आहे. दूध पावडरचे भाव प्रति किलोस २६० ते २७० रूपयांवरून वाढून २८० ते ३०० रूपये तसेच वटरचे भाव ३४० ते ३५० वरून ३८० ते ४०० रूपये झाले आहेत. त्यामुळे दूध खरेदीसाठी मोठी स्पर्धा सुरू झाली असून त्यामुळे दूध उत्पादक शेतक-यांना अधिकचा दूध दर देणे शक्य होत आहे. बारामती दूध संघामार्फत दूध उत्पादकांना नेहमीच रास्त व योग्य दूध दर देण्याबरोबरच संघामार्फत प्राथमिक दूध संस्थांना पशुवैद्यकीय सेवा सुविधा, आर्युवेदिक उपचार पध्दत प्रशिक्षण, मुरघास प्रशिक्षण दिले जाते. तसेच दुध उत्पादकांना डेअरी साहित्य विभागामार्फत चाफकटर, मिल्कींग मशिन, मुरघास बॅग व मका बियाणे इत्यादीची अनुदानावर (स्वस्त दरात) विक्री केली जाते.
बारामती संघाच्या दूग्धशाळेमध्ये दूध संकलन करीत असताना सर्व चाचण्या तपासून ताजे, स्वच्छ, निर्भेळ दूध स्विकृत केले जाते. दूध संघ गुणवत्तेनुसारच दूध संकलन करीत असून गुणवत्तेबाबत कसलीही तडजोड केली जात नाही, व दूधाची विकीही गुणवत्तेनुसारच केली जाते. दूध संकलनासाठी संघाने निर्धारित वेळ निश्चित केली असून निर्धारित वेळेतच दूधाचे संकलन केले जाते. दुध संघाकडे दूध तपासणीची सर्व अत्याधुनिक मान्यता प्राप्त दूध तपासणी यंत्रणा आहे. त्यामध्ये एफ.टी. – १ मशिन, मिल्कोस्कॅन, डेन्टसीटीमीटर, मिल्कोस्कीन या सर्व
अत्याधुनिक मशिनवर सर्वच संस्थांचे दूध तपासून घेतले जाते. संघाचे दूध “नंदन” बँडने विविध शहरामध्ये विकले जात असून, सदरचे दूध पुणे, मुंबई येथे नामांकित कंपन्यांना गुणवत्तेवरच मागील ब-याच वर्षापासून देत आहोत. त्यामध्ये मदर डेअरी दिल्ली, कॉफी डे, ताज हॉटेल, अॅड हयात हॉटेल, भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम, हिंदुजा हॉस्पीटल, बॅच कॅन्डी हॉस्पीटल, मंत्रालय, कोकण भवन इत्यादी ठिकाणी संघाचे नंदन दूधाची विक्री होत आहे.