बॉलिवूड अभिनेत्री सोहा अली खान आणि अभिनेता कुणाल खेमू व त्यांची मुलगी इनाया यांनी महाशिवरात्री निमित्त त्यांच्या घरी पूजा केली. दरम्यान पूजा करतानाचा एक व्हिडिओ त्यांनी सोशल मिडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओ मध्ये इनाया तिच्या आई- वडिलांबरोबर महाशिवरात्रीची पूजा करताना दिसली आहे. इनायाने महादेवावर जलाभिषेक केला आहे. इनायाच्या या व्हिडिओचे नेटकऱ्यांनी भरभरून कौतुक केले आहे.
View this post on Instagram
महादेवाची पूजा करताना कुणाल खेमू शंखनाद करताना दिसत आहे आणि सोहा त्याच्याकडे प्रेमाने बघत हसत आहे. सोहाची ही क्युट प्रतिक्रिया चाहत्यांना खूप आवडली. सोहा अली खान अनेकदा फॅमिली फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. इनायाचे क्यूट व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. इनायाच्या या व्हिडीओवर एका चाहत्याने लिहिले की, ‘सोहा तू तुझ्या मुलीला चांगले संस्कार देत आहेस.’ आणखी एका चाहत्याने लिहिले, ‘इनाया, तू मन जिंकले आहेस.’
दरम्यान, यापूर्वी सोहा अली खानने लेक इनाया गायत्री मंत्र गातानाचा व्हिडीओ शेअर केला होता, जो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये इनाया गायत्री मंत्र म्हणताना दिसला होता. कुणाल खेमूने देखील हा व्हिडीओ शेअर केला होता. कुणाल खेमू आणि सोहा अली खान यांची मुलगी इनाया हिने एकही शब्द न विसरता संपूर्ण गायत्री मंत्र तोंडपाठ केला.