Baramati Maharojgar Melava । ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील बारामतीत मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसतायेत. बारामतीत सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार दोघीही एकमेकींच्या विरोधात निवडणुकीच्या मैदानात उभ्या राहणार असल्याच्या चर्चां रंगात आहेत. मात्र त्याअगोदर आज या दोघी नणंद-भावजया एकमेकींना भेटल्या आहेत. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी(शरदचंद्र पवार गट )चे प्रमुख शरद पवारही आहेत. त्यामुळे या पवार कुटुंबातील तीन सदस्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शरद पवार, सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार एकत्र Baramati Maharojgar Melava ।
बारामतीत विद्या प्रतिष्ठानच्या कार्यालयात संस्थेची बैठक सुरू होती. या बैठकीला शरद पवार आले होते. सोबत सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारही बैठकीला उपस्थित होत्या. हे तिघेही या संस्थेचे ट्रस्टी आहेत. संस्थेच्या कामाचा आढावा घेतानाच संस्थेशी संबंधित निर्णयही या बैठकीत घेतले जाणार होते. यावेळी सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांची काय चर्चा होते? तसेच सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांची काही चर्चा होते का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
या बैठकीचं वैशिष्ट्ये म्हणजे सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार बारामतीत एकमेकींविरुद्ध लढण्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यानंतर या दोघी नणंद भावजया पहिल्यांदाच एकत्र भेटल्या. तसेच शरद पवार, सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार हे सुद्धा पहिल्यांदाच एकत्र भेटले.
बारामतीत शक्तिप्रदर्शन Baramati Maharojgar Melava ।
विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावरच नमो रोजगार मेळाव्याचं आज आयोजन करण्यात आलं आहे. या महा रोजगार मेळाव्याची जय्यत तयारी झाली आहे. तिन्ही पक्षांच्या बॅनर्स आणि होर्डिंग्जने बारामती गजबजून गेली आहे. तसेच तिन्ही पक्षांचे चिन्ह असलेले झेंडेही बारामतीत लावण्यात आले आहेत. चौकाचौकात ही बॅनरबाजी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आज बारामतीत येणार असून शरद पवार यांच्या बालेकिल्ल्यात शक्तीप्रदर्शन करणार आहेत. या महारोजगार मेळाव्याच्या माध्यमातून आज बारामतीत निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाणार असल्याचेही सांगितले जात आहे. त्यामुळे या मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.