बारामती (प्रतिनिधी) : बारामती शहर व तालुक्यात आज दिवसभरात 68 कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आले. बारामतीतीलआत्तापर्यंतचा कोरोना संक्रमिताचा उच्चांक ठरला आहे. एकूण संख्या 748 वर पोहोचली आहे.
बारामती शहर व तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बारामतीकरांसाठी चिंताजनक आहे. आज दिवसभरात सरकारी तसेच खाजगी प्रयोगशाळेत झालेल्या तपासणीत 68 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. 389 रुग्ण आतापर्यंत बरे झाले आहेत. तर 31 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे.