मुंबई- बॉलिवूड अभिनेता ‘अजय देवगण’च्या तान्हाजी: द अनसंग वॉरिअर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत यशाची घोडदौड सुरूच ठेवली आहे. याच पार्शवभूमीवर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी “नरवीर तान्हाजी मालुसरेंच्या वंशजांना आर्थिक मदत करा, त्यांना त्यांचा हक्क द्या ” असं ट्विट सोशल मीडियावर शेअर केलं आहे. नरवीर तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे.
तानाजी वंशज का हक
सन्माननीय अजय देवगणजी , जय महाराष्ट्र …
आपकी तान्हाजी फिल्म बहुत अच्छी बनी, मैने खुद 2 बार देखी. तानाजी 300 करोड से भी आगे जाके सुपरहिट हुई. मुझे लगता है की तान्हाजी के वंशज जो अभी कठिनाई से गुजर रहे है उन्हे मदत की जरूरत है— Bala Nandgaonkar (@BalaNandgaonkar) February 25, 2020
पाहुयात बाळा नांदगावकर काय म्हणाले ?
प्रथम बाळा नांदगावकर यांनी अभिनेता अजय देवगण यांच्या ‘तान्हाजी’ चित्रपटाचं कौतुक केलं. सन्माननीय अजय देवगण, जय महाराष्ट्र… तान्हाजी चित्रपट फार चांगला होता… हा चित्रपट मी स्वत: दोन वेळा पाहिला. तान्हाजी चित्रपटातने बॉक्स ऑफिसवर 300 कोटींपेक्षा अधिक कमाई केली.
और उनके प्रति आपका दायित्व बनता है. मेरी आप से विनंती है की आप आगे आये और उन्हे 2 करोड की मदद करे.
— Bala Nandgaonkar (@BalaNandgaonkar) February 25, 2020
दरम्यान, आता तान्हाजी मालुसरे यांचे वंशज कठिण परिस्थितीत जगत असून, त्यांना मदतीची गरज आहे. तान्हाजी मालुसरे यांच्या कुटुंबाच्या प्रती तुमंच उत्तरदायित्व बनतं. माझी आपल्याला विनंती आहे की, तान्हाजी मालुसरे यांच्या वंशजांना 2 कोटी रुपयांची मदत करावी. असं केल्यास मराठी माणूस आणि महाराष्ट्र तुमचा ऋणी राहिल, असं नांदगावकर म्हणाले.