चेन्नई : भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी येत्या सोमवारपासून चेन्नई सुपर किंग संघासह सराव करणार आहे. यंदाच्या इंडियन प्रीमिअर लीगमध्ये (आयपीएल) जर सरस कामगिरी केली तरच धोनीचे भारतीय संघात पुनरागमन होईल असे निवड समितीने स्पष्ट केले होते, त्यामुळे आता धोनीचा सराव आणि कामगिरी याकडे चाहत्यांचे लक्ष राहणार आहे.
इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील न्यूझीलंडविरूध्दच्या उपांत्य सामन्यात भारतीय संघ पराभूत झाला होता, त्यानंतर धोनीने क्रिकेटमधून ब्रेक घेतला होता.
Chennai Super Kings captain Mahendra Singh Dhoni to start training for IPL-13 from March 2. #MSDhoni #CSK
— Press Trust of India (@PTI_News) February 25, 2020
तेव्हापासून तो पुनरागमन करणार की निवृत्ती जाहीर करणार याबाबत ब-याच चर्चा झाल्या होत्या. या सगळ्या वृत्तांचे खंडन करत धोनी प्रत्यक्ष मैदानात सरावसाठी उतरणार असल्याचे चेन्नई संघ व्यवस्थापनाने जाहीर केले आहे. धोनी येत्या २ मार्चपासून आयपीएलसाठी सराव सुरू करणार आहे.