नगर -करोना संसर्ग विषाणूच्या काळामध्ये आमदार संग्राम जगताप यांनी गेल्या 4 महिन्यांपासून नगरकरांची सेवा करण्याचे काम केले आहे. अनेक गरजूंना किराणाद्वारे मदत केली. यापुढे जाऊन त्यांनी आयुर्वेद महाविद्यालय येथे गुरु आनंद कोविड सेंटर सुरु करुन करोना रुग्णांना चांगल्या दर्जेची सेवा देण्याचे काम सुरु केले.
करोना सेंटरमधील डॉक्टर, परिचारीका यांनी देखील पुढे येऊन करोना रुग्णांवर उपचाराबरोबर विश्वास देण्याचे काम केला आहे. भविष्यकाळात आयुर्वेद कॉलेजमधील कोविड सेंटर चांगल्या कामामुळे राज्यात नवे देशात प्रसिद्ध होईल. यासाठी सर्व डॉक्टर, कर्मचाऱ्यांनी आपले योगदान द्यावे, असे प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी यावेळी केले.
आयुर्वेद महाविद्यालय येथील गुरु आनंद कोविड सेंटरला पालकमंत्री हसनु मुश्रीफ यांनी भेट देऊन माहिती घेतली. यावेळी नगर विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार अरुण जगताप, आ. संग्राम जगताप, आ. निलेश लंके, विनायक देशमुख, गणेश भोसले, संजय चोपडा, ज्ञानदेव पांडुळे, प्रकाश भागानगरे, बाळासाहेब जगताप, अभिजित खोसे, बाबासाहेब गाडळकर आदी उपस्थित होते.
यावेळी आ. संग्राम जगताप म्हणाले की, नगर शहरातील युवकांच्या काही संस्था पुढे येऊन शहरात कोविड सेंटर सुरु करण्याची मागणी केल्यानंतर आम्ही सर्वांनी मिळून आयुर्वेद कोविड सेंटरला 30 बेडचे सेंटर सुरु केले. त्याचबरोबर चांगल्या दर्जेचे सात दिवसांचा जेवणाचा मेनू कार्ड तयार केलेला आहे.
करोनावर मात करण्यासाठी चांगल्या अन्नाची गरज असते, त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढली जाईल असे अन्न दिले जाणार आहे. आयुर्वेद कॉलेजचा तयार करण्यात आलेला काढाही देण्यात येणार आहे.