लंडन – ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरोन फिंचची दीडशतकी खेळी आणि स्टीव स्मिथच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेसमोर 335 धावांचे आव्हान ठेवले आहे. सलामीवीर ऍरोन फिंचने 132 चेंडूत 15 चौकार आणि 5 षटकारांसह 153 धावांची दमदार खेळी केली.
Australia end their innings on 334/7!
Skipper Aaron Finch was their star with the bat, scoring 153 – the equal highest individual score of #CWC19 so far. pic.twitter.com/ws0yiAv6l6
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) June 15, 2019
तत्पूर्वी श्रीलंकेचा कर्णधार दिमुथ करूणारत्ने याने नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियाच्या संघास फलंदाजीस पाचारण केले होते. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 7 बाद 334 धावा केल्या. ऍरोन फिंच व्यतिरिक्त स्टीव स्मिथ धुवाधार खेळी करत 59 चेंडूत 73 धावा केल्या. अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल याने 25 चेंडूत 46 धावा करत ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 334 पर्यंत नेली.
Half-century for Steve Smith!
This partnership is getting away from Sri Lanka.
FOLLOW LIVE ⬇️https://t.co/7Gf1YRrFTu pic.twitter.com/mWf77tkZBn
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) June 15, 2019
श्रीलंकेच्या गोलंदाजानी पुन्हा एकदा निराशा केली. वेगवान गोलंदाज नुवान प्रदिप याने 10 षटकांत 88 धावा दिल्या. त्याच्या हाती एकही विकेट लागली नाही. तर धनंजय डी सिल्वा आणि इसुरू उदाना यानी प्रत्येकी 2 गडी बाद केले. अनुभवी गोलंदाज लसिथ मलिंगा याने 10 षटकांत 61 धावा देत 1 गडी बाद केला.