सिडनी – महंमद रिझवान, अमर जमाल व आगा सलमान यांच्या दमदार अर्धशतकांच्या जोरावर पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसर्या कसोटीत आपल्या पहिल्या डावात सर्वबाद 313 धावा केल्या आहेत. दिवसातील उर्वरीत खेळात यजमा ऑस्ट्रेलियाने आपल्या पहिल्या डावात बिनबाद 6 धावा केल्या आहेत. पहिले दोन्ही कसोटी सामने जिंकत यजमान संघाने तिन सामन्यांची ही मालिका यापूर्वीच 2-0 अशी जिंकली आहे.
3rd Test Update: Stumps (day 1) at Sydney Cricket Ground
Pakistan: 313
Australia: 6-0 (1 ov)Australia trail by 307 runs.
Scorecard: https://t.co/nSkOnKl7dG#AUSvPAK
— Pakistan Cricket Live (@TheRealPCB_Live) January 3, 2024
या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार शान मसुद याने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर कर्णधार मसुदसह स्टार फलंदाज बाबर आझमही लवकर परतल्यावर एकवेल पाकिस्तानची स्थिती ५ बाद ९६ अशी बिकट बनली होती. मात्र, त्याचवेळी महंमद रिझवानने ८८ धावांची खेळी केली. त्याने आगा सलमानसह संघाचा डाव सावरला. सलमाननेही अर्धशतकी पल्ला पार केला. रिझवान १०२ चेंडूत १० चौकार व २ षटकारांसह ८८ धावांवर बाद जाल्यावर सलमानने साजीदखानसह संघाचे द्विशतक फलकावर लावले. साजीदही लगेचच परतला.
दरम्यान सलमानही अर्धसथकानंतर फारकाळ टीकू शकला नाही. त्याने ५३ धावांच्या खेळीत ६७ चेंडूत ८ चौकार मारले. तळात अमर जमालने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीवर वर्चस्व गाजवले. त्यानेही ८२ धावांची अर्धशतकी खेळी करताना संघाला त्रिशथकी धावसंख्या उभारून दिली. त्याने आपल्या खेळीत ९७ चेंडूत ९ चौकार व ४ षटकार फटकावले. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार पॅट कमिन्सने सर्वाधिक ५ गडी बाद केले. मिचेल स्टार्कने २ बळी मिळवले. दिवसातील उरलेल्या १ षटकांत ऑस्ट्रेलियाने बिनबाद ६ धावा केल्या. या कसोटी सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय कसोटी व एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होत असलेला ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर ६ धावांवर खेळत असून उस्मान ख्वाजाला अद्याप खाते उघडायचे आहे.
संक्षिप्त धावफलक –
पाकिस्तान पहिला डाव – ७७.१ षटकांत सर्वबाद ३१३ धावा. (महंमद रिझवान ८८, अमर जमाल ८२, आगा सलमान ५३, पॅट कमिन्स ५-६१, मिचेल स्टार्क २-७५).
ऑस्ट्रेलिया पहिला डाव – १ षटकांत बिनबाद ६ धावा. ( डेव्हिड वॉर्नर खेळत आहे ६, उस्मान ख्वाजा खेळत आहे ०).