IND vs SA 2nd Test, Virat Kohli Video : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना बुधवारी (3 जानेवारी) केपटाऊनमध्ये सुरू झाला. दक्षिण आफ्रिकेचा कार्यवाहक कर्णधार डीन एल्गरने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. त्याचा निर्णय चुकीचा ठरला. दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण संघ पहिल्या डावात 55 धावांत गारद झाला. भारताकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक सहा बळी घेतले. आफ्रिकन संघाच्या इनिंग दरम्यान विराट कोहलीची अनोखी शैली पाहायला मिळाली.
दरम्यान, घडलं असं की, दक्षिण आफ्रिकेचा केशव महाराज हा फलंदाजीसाठी आला तेव्हा स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या डीजेने आदिपुरुष चित्रपटातील ‘राम सिया राम’ हे गाणे वाजवले. हे पाहून कोहली खूश झाला. विराट कोहलीला आपल्या भावना आवरता आल्या नाहीत. त्याने हात जोडले आणि आणि भगावन श्रीराम सारखं धनुष्य खेचण्याची पोझ दिली.
Cute act by Virat Kohli with Keshav Maharaj and the Ram Siya Ram song associated with him.. pic.twitter.com/fdE0WqIYM8
— Keh Ke Peheno (@coolfunnytshirt) January 3, 2024
मैदानावरच हे दृष्य पाहून स्टेडिअममधील प्रेक्षक चांगलेच खुश झाले. कोहलीची ही शैली लोकांना खूप आवडली. कोहलीचा हा व्हिडिओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
एकदिवसीय मालिकेदरम्यान देखील वाजलं होते हे गाणे…
याआधी एकदिवसीय मालिकेतही केशव महाराजसाठी हे गाणं वाजलं होतं. भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यानच्या तिसऱ्याा एकदिवसीय सामन्यात केशव महाराज फलंदाजीसाठी मैदानात उतरताच ‘राम सिया राम’ हे गाणं वाजवण्यात आलं होतं. त्यावेळी केएल राहुलने मजेशीर प्रतिक्रिया दिली होती.
Virat Kohli acting like LORD RAM on RAM SIYA RAM song ♥️♥️♥️ pic.twitter.com/ZTLOGNrAWb
— 𝑀𝒾𝒸𝓇𝑜 𝐿𝑜𝓋𝑒𝓇 (@Swapnil113goat) January 3, 2024
त्यादरम्यान, केएल राहुलने हसत हसत विकेटकीपिंग करताना केशव महाराजला याबाबत विचारलं होतं. तू आला की हे गाणं वाजतं. त्यावर केशव महाराजने त्याला हसत-हसत सहमती दर्शवली होती. दरम्यान, दक्षिण अफ्रिकेकडून खेळणारा केशव महाराज हा हिंदू आहे. भारत दौऱ्यावर आला की तो आवर्जून मंदिरात जातो.