वाघोली – चारित्र्याचा संशयावरुन सासरच्यांनी हात पाय पकडून उंदीर मारण्याचे औषध पाण्यात टाकून महिलेला जबरदस्तीने पाजून महिलेच्या खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी पती, सासू, सासऱ्यांसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. सदरची घटना केसनंद येथील लाडबा वस्ती परीसरामध्ये घडली आहे.
याबाबत साक्षी गिरी (वय २३) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पती हनुमंत अंकुश गिरी, सासू सरस्वती, सासरे अंकुश, दीर आदित्य, नणंद सुजाता भारती, शिवाजी भारती यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विवाहानंतर पती, सासू, सासरे आणि नातेवाईकांनी तिला त्रास देण्यास सुरुवात केली होती तर तिचा शारिरिक आणि मानसिक छळ केला जात होता. हनुमंतने तिच्या चारित्र्याचा संशय घेतला. उंदीर मारण्याचे औषध पाण्यात टाकून साक्षीला बळजबरीने पाजून खूनाचा प्रयत्न केल्याचे साक्षीने फिर्यादीत म्हंटले आहे.